शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष: एक सामाजिक बांधिलकी (संक्षिप्त माहिती)
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हा उपक्रम गरजू रुग्णांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे नगरविकास मंत्री व आजचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्ह्यात या कक्षाची सुरुवात झाली.
या कक्षाचे ब्रीदवाक्य आहे — “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा.”
आजपर्यंत हजारो गरजू रुग्णांना या कक्षाच्या माध्यमातून मोफत किंवा सवलतीच्या दरात औषधोपचार, शस्त्रक्रिया, तपासण्या व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळाली आहे. या कक्षाचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कक्षप्रमुख तथा मूळ संकल्पक मंगेश चिवटे व कार्याध्यक्ष श्री राम राऊत यांच्या व्यवस्थापनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारत आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये: सातत्याने रुग्णसेवा: हजारो रुग्णांना आजवर मदत – शस्त्रक्रिया, औषधे, आयसीयू सुविधा, तपासण्या आणि कागदपत्र मार्गदर्शन.
मुख्यमंत्री आरोग्य निधी सहाय्य: कक्षाच्या माध्यमातून शासनाकडून आर्थिक मदतीसाठी अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन.
दैनंदिन सेवा केंद्र: गरजू नागरिकांसाठी ठाणे येथील कार्यालयातून तातडीने मदत उपलब्ध.
टोल-फ्री हेल्पलाइन व संपर्क सेवा: कोणतीही अडचण असल्यास त्वरित सहाय्य.
विशेष उपचार प्रकरणे: अपघातग्रस्त, गंभीर आजारांतील शस्त्रक्रिया यासाठी खास मार्गदर्शन व मदत.
मानवी मूल्यांवर आधारित कार्य:
या कक्षाचे सर्व काम “सेवा हीच शिवधर्म” या तत्त्वावर आधारित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दूरदृष्टीने या कक्षाचा कार्यभाग अतिशय यशस्वीपणे सुरू आहे.
कक्षाचे नेतृत्व — मंगेश चिवटे
या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक मंगेश चिवटे यांनी सुरुवातीपासून आजपर्यंत वैद्यकीय मदत कक्षाचे संचालन अत्यंत कार्यक्षमतेने केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली: हजारो रुग्णांना मोफत व उपचार मिळाले, अनेक रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळवून दिली गेली
विविध भागांतील शिवसेना शाखांच्या समन्वयातून व्यापक नेटवर्क तयार झाले
मंगेश चिवटे हे केवळ व्यवस्थापक नव्हे, तर सामाजिक बांधिलकीने प्रेरित असलेले एक संवेदनशील नेतृत्व आहेत. ते रुग्णांच्या गरजा समजून घेत वैयक्तिक पातळीवर मदतीचे तंत्र आखतात, हेच कक्षाच्या यशामागील खरे कारण ठरते. तसेच हजारो रुग्णसेवकांची फळी कार्याध्यक्ष श्री राम राऊत यांच्या व्यवस्थापनाखाली तयार करून त्यांनी एक सक्षम नेतृत्व पार पाडले आहे
वाढता विस्तार:
सुरुवातीला ठाण्यात सुरू झालेला हा उपक्रम मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र व विदर्भ इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यात देखील आणि आसपासच्या सर्व जिल्ह्यात परिसरांमध्ये देखील विस्तारलेला आहे. शिवसेनेच्या स्थानिक शाखांच्या सहकार्याने, याचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होत आहे.
हे का महत्त्वाचे आहे?
आजच्या यंत्रवत आणि महागड्या आरोग्य व्यवस्थेत, शिवसेनेने उभा केलेला हा वैद्यकीय मदत कक्ष म्हणजे गरिबांचा आधार, वृद्धांचा विश्वास आणि सर्वसामान्यांचा ‘आरोग्य साथी’.
शुभ संदेश, जय महाराष्ट्र
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्षाची स्थापना 17 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आली तेव्हापासून या कक्षाने रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ही ब्रीदवाक्य म्हणून राज्यातील गोरगरीब रुग्णांना सर्वोत्तरी सेवा केली केवळ पैशांना भावी गरीब रुग्ण खर्चिक उपचारांपासून वंचित राहू नये याचा ध्यास घेतला आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मोफत तपासणी मोफत अथवा सवलती शस्त्रक्रिया मोफत औषध उपचार असा सेवा धर्माखंडपणे चालू ठेवला. या कार्यास अधिक व्यापकता येण्यासाठी सुसूत्रतापणा येण्यासाठी व सर्वसामान्यांना मोफत अथवा सवलतीच्या दरात दर्जेदार आरोग्य सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व मंगेश चिवटे यांच्या मध्यामतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ग्रंथाची देखील निर्मिती करण्यात आली.
बरोबर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते शासकीय व सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी या क्षेत्रात नव्याने कार्य करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची मदत मिळत गेली.
या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा पुढील कार्यास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
माननीय श्री एकनाथजी शिंदे
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
Godavari Apartment, Lokmanya Tilak, Kopri Rd, near Mangala High School, Daulat Nagar, Thane East, Thane, Maharashtra 400603
WhatsApp us